Be yourself; Everyone else is already taken.
— Oscar Wilde.
This is the first post on my new blog. I’m just getting this new blog going, so stay tuned for more. Subscribe below to get notified when I post new updates.
Be yourself; Everyone else is already taken.
— Oscar Wilde.
This is the first post on my new blog. I’m just getting this new blog going, so stay tuned for more. Subscribe below to get notified when I post new updates.

रंगारंग दुनियेत वाढले
रंगीत सरडयाचे भाव,
जातिवंत असला तरी
कुपापौतर त्येची धाव।।
वाघाचं कातडं पांगरून
थाटात मिरवतेय गाढव,
गोट्याले सेंदूर लेपाटून
त्येचा होत नसतो देव।।
मानसानबी रंग बदलू केला
ब्रेडचा बेसनासंग वडापाव,
उटाववरून शेळ्या परीस
भारी हाकने पाण्यावर नाव।।
गरज सरो वईद मरो
झाला आमचा सभाव,
शस्त्रा बिगर बसते अंगी
शबदा शबदाचा घाव।।
आयत्या पिठावर रेगोट्या
मारणाऱ्यायची धुमछाव,
कधीतरी वाढत असते
कांद्यायचे हमी भाव।।
कामा पुरता मामा
त्येचा काय टिकाव,
माणसा वरी कुत्र्याचा
पडू लागलाय परभाव।।
गजानन काकडे
माणिकग्राम धोत्रा

थे धावत होती
मी पयत होतो
थे दूर जात होती
मी रडत होतो
दिसली जवा मले
थे तती च उभी होती
कोण जाणे कोणास ठाउक
कोणाची वाट पायत होती
गळबळी न जवा मी
तिच्या जवळ पोचलो
अंदाज हाय माया
मी तिले असन दिसलो
दिसलो जवा तिले
थे लागली भाऊ पयाले
धाक धुक मोठी माया
लावली भाऊ जीवाले
गेलती भाऊ थे पुढे
मले मागून दिसत होती
दोस्त म्हणे मायावाला
थे तूयावालीच होती
गती गती थे माया
नजरेच्या आळपं गेली होती
Last time होता भाऊ थो
दुसरी st च न्होती…
भल्या भल्या न
तिच्या संग घेऊ नये पंगा
थे आयकत नाही कोणाची
बराबर दावते इंगा…
गौरव श्री. कांडलकर
मोझरी
7666067286

एक दिवस उधारीचं गिऱ्हाईक आलं माह्या दुकानात,म्हणे भौ,मी राह्यतो मांगलच्याच मकानात.
उधार आपल्याले बिलकुल पटत नाई,नगदीले आपुन जराबी नटत नाई.
पन गेल्या सालीच केला म्यां ईवाई लेकीची माह्या हे पयलीचं हाय दिवाई,
लेक जवायाले घ्या लागते कपडे.
अनखीन येक-दोन मांग हायेत लफडे,
पयल्या दिवाईले आना लागते लेक.
त्यात लाल्याचा लेट झाला चेक,
मले सौदे पाह्यजे दोन-चार पह्यल्यांदाच मांगुन राह्यलो भौ उधार.
म्या म्हनलं मा नाई उधारीचा धंदा,
मले फकस्त पाह्यजे रोख थो चंदा.
चेक आल्या-आल्या रोख घिउन यील,
तुमचे पैसे तुमच्या हाती बिनधोक दील.
पैसे-पैसे काय करता शेठ,
माह्ये भेटल्या-भेटल्या घिउन यील थेट.
पैश्यालेतं कोंबडीबी खात नाई,
आज उधार घेतल्याबीगर मी काई जात नाई.
नगदीत तं त्याची च्यापत्तीचीबी सोय नसते,
उधारीत म्हनलकी थो च्यायला हत्तीबी घेते.
उधार मांगताखेपी होतात थे हरन,
वसुलीले चकरा मारता-मारता आपलं होते मरन.
उधारी साठीतं काय बी करतात बायना,
वसुलीसाठी झीजतात आपल्याचं भौ मंग वायना.आपल्याचं भौ मंग वायना….
किसन मानकर
वाडेगांव
९१३०७४३९८१
व-हाडी कथा
“” काय जाम उन्हाया तापुन रायला न हिम्मतभौ, जीव निर्हा पानी पानी करते राजे हो ! अन त्यात ह्या निवळणुका –पार्टीचा आदेस पाळा त मंग जा भर उन्हात या गावातून त्या गावले — “”
“” हाव न भौ , काल त बेजा लाज गेली पार्टीची –भर उन्हात सभा ठिवली सुजात रावची –इतका मोठा मंत्री ! पार्टीची सारी भिस्त त्याच्यावरच त हाये -अन मंत्री साईब हाये बी खमक्या –पण त्याच्या सभेले बी लोकं जमले नाई न भौ –गंगापूर एव्हढं जिल्ह्याचं ठिकान पन सभा निरह्या फूस झाली म्हणतं हाई आपले नेते मंडई –“”
“” हाव न राजे हो , परवा आपल्याकळे बी त सभा लावली सुजाता राव सायबाची -अन पार्टी न आता हुशारी केली का सभा संध्याकाई ठिवली -उन्हात लोकं येत नाई म्हून -“”
“” ते त ठिक हाये भौ –पन मग सभेले लोकं आन्या चे कुठून ? आता लोक तसे नाई येत लेकाचे , लोकं बी हुशार झाले , ते बी म्हणते की हाच त आमचा कमायाचा हंगाम हाई म्हून –मंग एका एका माणसाले अन बाईले दोनसे नाई कदी कदी तिनसे बी ध्या लागते -वरून जेवन अन जाया येयाले गाळ्यायची सोय बी करा लागते –गंगापूर सारख होयाले नको म्हून वरून हुकूम बी आला हाय -“”
“” हुकूम देयालें काय जाते ? पैसे बी पालठवा म्हणा त्यायले –नाई त मंध्दीच पसार करतींन मांगळल्या सारखे –नाव सांगल पोलीसायच अन साल्यायन गपकले आपापसात –“”
“” पन मोठ्या सायबाचा हुकूम हाये त पैसे बी पाठोतीन ते –पाच पन्नास लाख पाठवा म्हंजे सारी सभा पॅक करून टाकू म्हणा त्यायले “”
टीरिंग ssss टिरिंग ssss फोन ची घंटी वाजत व्हती , जिल्हा कमिटी च्या हाफीसात हिम्मतभौ अन खुशालराव फोनच्या जवय च बसेल व्हते पन फोन कोनी उचलत न्हवते -तो त्याले म्हने अन तो त्याले म्हने ,
“” वो भौ , उचला न फोन ,कव्हाचा वाजून रायला , पार्टी अध्यक्षांचा असीन न बावा , काई म्हणते ते त ऐका ना राजे हो !! खुशाल भौ तुमी उचला फोन ,तुम्ही जिल्ह्याचे अध्यक्ष हाईत ना मंग उचला फोन , कोन हाये अन काय म्हणते ते त पहा “”
खुशालभौ न फोन उचलला तसा गंभीरराव मोहिते, राज्य अध्यक्ष चा, पार्टी च्या हाफिसातून मुंबई हुन गंभीर आवाज ऐकू आला –तसा खुशाल भौ नमस्कार करून काय हुकूम हाई तेआयक्यासाठी कान टवकारले
“” हे पाहा खुशाल राव परवा तुमच्या कळे सुजातरावांची सभा लावली हाये पक्षान , निवळणुकीचा काळ हाये -तुमचा उमेदवार निवळून आला पाह्यजे –त्यासाठी सभा टोलेजंग व्हायाले पाह्यजे -गंगापूर सारखी लाज दावाळू नका -काय आयकताय नव्ह , “”
“” हाव सायेब आमचे जिल्ह्याचे नेते सारे मिळून आमी तयार हावो -पार्टी परचार जोरात चालू हाये ,परत्येक तालुका अध्यक्षाला लोकं आण्याचा कोटा ठरवून दिला हाये -मानस येतील सायेब पण सारे नेते का कु करत हाईत -कशासाठी म्हणता -अहो सायेब पैश्यासाठी बोंबलत हायेत सारे “”
“” बरं बरं, मी सांगतो अजाबराव पाटलाले खर्च क-याले — तिकीट आमी मुद्धामच त्यायले दिल , खर्च क-याची धमक पाहूनच अजाबरावांना तिकीट दिल्या गेलं हाये – तुमच्याकळची मोठी असामी हाये ती –कसं ही करा पन माणसं आना “”
“” हाव जी हाव , तुमी चिंता नका करू –एखादं लाख तरी गर्दी जमा करू –बस हात जरा ढिल्ला सोळा म्हंजे झाल “”
पान्या सारखा पैसा वाहवन सुरू झाला , अन गावोगावी कार्यकर्ते धाळून लोकायले बायायाले पैसे देयाच कबूल करून करून त्यायले बुक केल्या गेलं -मधातल्या बोलकी मानस चांगला डल्ला मा-याले लागले –ट्रॅक्टर, ऑटोरिक्षे, छोटे हत्ती ,टेम्पो मेटाडोर सरे बुक केल्या गेले –खायाची यवस्था एका मारवाड्याले दिली गेली –जो तो आपली आपली जबाबदारी ओयखून कामं करतं व्हता –अजाबराव पैशाची कमी पळू देत नव्होता —
अमडापुर -चांगलं जिल्ह्याचं ठिकान , गाव मोठं , महापालिका हाये अठी – दहा बारा लाख वस्ती असिन -आजू बाजू च्या गावामंधी बी पाच सहा लाख लोकवस्ती –म्हंजे लोक जास्त त सभेले गर्दी बी जास्त पायजे असं गणित खुशालराव अन हिम्मत भौ करत व्हते — अन तसंच बाकीचे नेते करत व्हते –अन सरे कायजीन देयेल कामं करत व्हते -पार्टीच्या इज्जतीचा सवाल व्हता –म्हून जीवतोळ कामं करत व्हते –कोनी गाळ्यायच पाह्ये त कोनी गावोगाव च्या कार्यकर्त्यायले फोन करून लोकायचे बद्धल ईचारे, कोनी खायाची सोई बद्धल -अस येक ना अनेक काम झाले की नाई ह्याची चौकसी करत व्हते —
“” काय नरू भौ , किती माणसं पाठोता मंग –किती गाळ्या बुक केल्या -दहा बारा हजार तरी पाठवा बॉ -“”
“” पायतो बॉ , कोशीस त चालू हाये की वीस पंचवीस पाठोयाची –लोकं बी तयार हाईत -मिन 25 मेटाडोर , शंभर ट्रॅक्टर , 200 टेम्पो बुक केले हाईत -पन सायाचे पयले पैसे मांगुन रायले ते -आता कसं करा ,सांगा बॉ -पैसे ध्या बॉ पाठवून –लोकायले समजावलं मिन की -तठी गेल्यावर भेटतीन पैसे – “”
“” नरू भौ , तुमी चिंता नका करू –पैसे पाठवून देतो -दुपारी तीन वाजेलोक पाठवा माणसं “”
नरू भौ , राजकारणात मुरलेला माणूस , गेल्या वीस पंचवीस वर्सा पासून तो राजकारणात हाये , राजकारण आश्वासना वर नाई चालत हे तो जाणून व्हता –नाई त स्वतः च्या पदराले चोट बसते हे नरुले माहीत व्हत -म्हून त्यानं पैसे हाती आल्यासीवाय गाळ्या वाल्याना रोकून धरेल व्हत — दुपारचे बारा वाजले तरी पैसे येयाच नाव नाई मंग करा कसं -? नरूभौ न खुशाल रावले फोन केला अन पैशा बद्धल ईचारल –
“” सायेब , तुमचा मानूस नाई आला अजून , अन हे गाळ्या वाले निंघ्याले तयार नाई ना राजे हो -हाती पैसे ध्या मंग पुढी धकतो -असे म्हून राह्यले ते -मंग कसं करू ? सांगा बॉ “”
“” मानुस निघेल हाये फटफटी वर बस पोचतच असिन -जास्त लेट नका करू नरु भौ –नाई त आपली स-यायची लाज जाईन बॉ “”
“” बस पैसे हाती आले की निंघतो स-यायले घेऊन -“”
नरु भौ च्या हाती पैसे पोचले अन मंग तो अंगात सात हत्तीचं बळ आल्या सारखा कामाले लागला — सऱ्या गाळ्या वाल्याले बोलावून निम्मे पैसे देल्ले अन मानसायले घेऊन निघ्याले सांगल -तो स्वतः बी गावात घरोघरी फिरून बाया मानासायले तीनशे रु रोजाचे कबुल करून शंबर शंबर रुपये त्यायच्या हातावर टिकवुन अन बाकीचे तठीसा भेटतीन -अस कबुल करून बाया मानसायले गाळ्यांत बस्याले लावले —
“” ये शांता बय चालत नाई का तू सभेले -आव माय तीनसे रुपये भेटतात न -जायाले -इयाले गाळी-वरून खायाची बी सोय हाये तठीसा- चाला बाया हो -बसा पटापट गाळीत “”
“” चाल न व तू बी सरे –काऊन घरी राह्यत -तिनसे काऊन दावळत हाये बयना? “”
“” आलो असतो व , पन माह्य लेकरू तापान फंनफनून रायला न – नाई त पैसे कोनाले नको हायेत –“”
“” आव चाल तू सरे , आपु त्याले तठी डाक्टर ले दाखवू -घरी राहून काय करशींन “”
“” तुव्ह बी म्हन्न बरुबर हाय म्हना -चाल माय , लेकराले घेतो संगे – पैसे कोन देऊन रायले ? “”
“” आपल्या गावाचा नारायण आबा देऊन रायला न -चाल न मंग -तुह्या बुडीले बी घेणं , तिले बी तिनसे भेटतीन न -“”
“” आव बुडिले त चालता नाई येत न -निऱ्या पाय घोयासते –अर्ध्या गवऱ्या गेल्या मसनात – तिले कश्याले तकलीफ देवा आता “”
“” पाय बयना , मिन तुले चांगला सल्ला देल्ला आता तुव्ह तू पाय — फालतू हाताचे तिनसे दावाळून राह्यली तू “”
सरी न इचार केला , शांताबय सांगते ते बी खरच हाये –गाळीत त बस्याच हाये , आपु बुडिले गाळीतून बी खाली नाई उतरवू -अठी बुडीच तोंड दाखवलं की झाले पैसे टाईट – असा इचार करून सरींन बुडिले बी संग घेयासाठी आवाज देल्ला–
“” आव आत्या ssss, आत्या व ss , झोपल्या की काय –आव सभेले जायाचं तिनसे भेटून रायले -पळू पळू काय रायता -तुमी बी चाला तेव्हढेच कामाले येतीन तुमच्या– गाळींन जान अन गाळींन येन “”
“” आव सरे, मले चालता येत नाई, ढुंगण घासत गोद्रित जावा लागते -अन मले कश्याले नेत इतक्या दूर – –सभे मंदी लै गर्दी असते न व –त्या गर्दीत माहा जीव जाईन व “”
“” मंग बसा घरीच , हात चोयत -तिनसे काय झाळाले नाई लागत -माह लेकरू तापान बेजा बिमार हाये तरी मी घेऊन जात हाये न त्याले -माह्या लेका पेक्षा तुमचा जीव मोलाचा हाये का व बुडे “”
“” बरं माय –चाल मंग –माहा हात मातर सोळू नको तू -तुह्या मांगे मांगे येईन मी ढुंगण घासत “”
अस म्हणत बुडी खाटी वरून खाली उतरली , सरी न तिले आधार देल्ला-बुडी न लुगळं ठीक केलं -पदर डोई वर घेतला -तुटेल माटेल वायना पायात घातल्या -गिलास भर पानी पेली -अन सरी संगे गाळींलोक ढुंगण घासत घासत आली -दोन तीन बायांयन उचलून तिले गाळीत बसवलं –मंग सरी नारायण आबा कळे पैसे मांग्याले गेली – शांता बयबी तिच्या जवान पोरीले घेऊन त्या नारायण आबाजवय पैसे मांगू लागल्या –त्यानं बी शंबर शंबर हातावर टेकून देल्ले –बाकीचे नंतर देतो अस म्हून सऱ्यायाले गाळीतून त्यानं अमडापुरले भर उन्हात नेलं अन उन्हा उन्हातच गाळीतून उतरवून सारे बाया माणसं मंग शहीद मैदाना कळे नारायण आबा च्या मांगे मांगे जात व्हते – सऱ्यायच्या हाती पक्षाचे झेंडे देऊन एका लायनीत सरे चालत–सुजातराव जिंदाबाद जिंदाबाद-च्या घोषना देत व्हते , त्यायच्या हातातले झेंडे फळकत व्हते – सरी बुडि चा हात धरत , त शांताबय जवान पोरीचा हात धरत घोषना देत व्हत्या -गर्दी संगे हळू हळू चालत व्हत्या -सरीचा लेक बिमार व्हता त्याला दवापानी क-याची बी फुरसत नव्होती -सरीले त वाटे की ही सभा लौकर संपून जावी अन मंग तिच्या लेकराले डाक्टर कळे घेऊन जायाले तिले बरं पळीन -तिच्या डोया समोर तिचे अन बुडी चे सहासे रुपये दिसत व्हते तसा तिले हुरूप येये अन ती जोर जोरात जिंदाबाद म्हने -शांताबय बी तिच्या संगे असल्याने दोघीले एक दुसरीचा आधार वाटत व्हता —
“” जोरान बोंबला न बे लेकायहो–खाऊन नाई आले की काय -आवाज जोराचा आला पाह्यजे न “”
नारायण आबा सऱ्यायले सूचना देत व्हता –त्याच्या हाती पक्षाचा मोठा झेंडा व्हता अन मोठ्या पुढ-यासारखा चालत व्हता -चालता चालता तो त्या गर्दीत कुठी गायब झाला , कोनाला तो काई दिसेना -जो तो एक दुसऱ्याले इचारे –आबा कुठी हाय ? कुठी दिसत नाई तो –दुसरा धीर देत म्हणे -आबे लेक हो तो तुमच्या आमच्या सारखा लहान माणूस हाये काय -मोठा माणूस हाये आबा -त्याले वरच्या पुढ-यायन बोलावलं असीन -तुमी चाला घोषना देत –
“” आव पन ते खायाची सोय करेल हाय म्हणे त जेवन कधी भेटींन बॉ -ओळळून ओळळून पोट रिकाम झालं राजे हो ! पानी त पाजा आमाले –घसा कोलळा ठन झाला न बावाजी भर उन्हात चालून रायलो न आमी जीव कसा पाण्यानं तगमग व्हवून रायला -अन ते बाकी चे दोन से रुपयांची सोय बी लाव्याले पाह्यजे न — माहा लेक पहा बरं कसा तापान फनफनत हाये -मले डाक्टरकळे नेयाच हाय त्याले “”
“” सरे ! आव सरे , असं कुठंलोक चाला लागते व –माह्या पायाले गोये आले न , माह्याच्यान आता नाई चालल्या जात व -घासून घासून ढुंगण सोल्ल माह्यावाले -तुले काय ? तहान बी लागली -पोटात कावळे काव काव करून रायले -सकाय पासून काई खाल्लं नाई -तुन देयेल जेवन तसंच डाल्या खाली झाकून ठिव्हेल हाये मिन -“”
“” आत्या , तुमची बी कमाल झाली -जेव्याले काय हरकत व्हती -आता इतक्या गर्दीत कुठून आनू मी तुमच्या साठी जेवन अन पानी-“”
सरी याले त्याले इचारे -पन कोनी काई बोलत नव्हतं –काय बोलतींन ? त्यायलेच मालूम नव्हतं -ते पन सरी सारखाच इचार करत व्हते –संध्याकायचे पाच वाजले व्हते उन्ह कमी झालं व्हत –सभा सुरू व्हयाले अजून टाइम व्हता म्हून मंग खायाचे पाकीट ज्याच्यात पुरी -भाजी व्हती ते जनतेले वाट्याले सुरुवात झाली व्हती –खायाच पाकीट घेयाले जो तो पुढी पुढी करत व्हता -त्याच्यांच्यान जाम गर्दी उसळली -कोनी कोना च्या अंगावर त कोनी कोनाच्या -असी लोटापोट चालू व्हती –त्यात सरी अन शांताबयचा नंबर काई लागेना -मंग दोघ्या बी जाम वैतागल्या अन नारायण आबा ले लागल्या शिव्या देयालें — तितक्यात सुजातराव मंत्री सायरन वाजवत सभेच्या ठिकाणी लवाजम्या सह आला -जो तो त्यायच्या संगे बोल्याले पाह्ये त कोनी त्यायच्या संगे फोटो काढ्याले भेटला पायजे म्हून लोटालोटी करत व्हता –बाकीचे नेते त्यायले आवरत व्हते पन त्यातले हवसे नवसे गवसे आयकतीन कश्याले –फोटो काढ्याच्या चक्कर मंदी जी लोटालोटी चालू व्हती त्यापायी स्टेजच्या मागील बाजूकळच्या खुर्च्या खाली पळल्या -लोकायले वाटलं स्टेजच पळला -मंग काय ? सारी पळापळ सुरू झाली -कोनी कोनाचं आयकेना –
“” आव सरे ! कुठी गेली व माय -हे लोक मले चिवंदुन रायले न व -आव माह्या अंगावर बुटा खेटरासईत मले खुंदलुन रायले न व -आव माय व -अरे बापरे !! माय व sssssssss ! “”
बुडीच्या आंगावर सऱ्या गर्दीचा घोयका येऊन पळला बुडी नीरा चेंबली -तिले स्वास बी नाई घेता येये —
“” आव आत्याबाई ! आव कुठीसा हाईत तुमी — कुठी दिसत नाई बुडी –कुठी गेली व माय -अन कुठी पाहू आता या गर्दीत – आत्या व sss वो आत्या sssss !””
सरी ईकळून तिकळे लेकराले काखीत घेऊन पयत व्हती अन आत्या व आत्या म्हून आवाज देत व्हती -पन बुडी चा आवाज काई येईना अन बुडी बी दिसेना -लोकायची पयापय चालूच व्हती -गर्दी चा येक घोयका सरीच्या आंगावर येऊन पळला तसी सरी खाली पळली अन नेमक तिच्या काखीतल तिचं लेकरू बी दूर जाऊन पळलं -लेकरू लल्याळे लागलं पन सरीच्या आंगावर लोक पळेल असल्यानं तिले काईच हालचाल करता येत नव्होती -तिकळे लेकरांले बी लोक खुंदलुन रायले -पोरग एका झटक्यातच चिडी चूप झालं — सरीन कस तरी आंग काळल अन ती1 लेकराले उचलाया धावली -पन लेकरू गप झालं व्हत -मायच मन हंबरु लागलं ओरळू लागलं –तिचा तो आक्रोश आसमंत भेदून जातो की काय अस वाटत व्हत लेकराले घेऊन ती सैरावैरा पवू लागली पन तिचा लेक तिले सोळून गेला व्हता -तिनसे रुपयापायी सरींन सासू अन लेकराले गमावलं व्हत –अन सुजतराव न धीर गंभीर व्हत भाषन ठोकून दिल्लच -नारू भौ न जमलं तितका हात मारून घेतला व्हता पन सरीच जग बुळाल व्हत
रमेश सरकाटे

लय गांजते लेका हा परतीचा पाऊस।
पैदा व्हते राज्या ऊसाच्या पोटी काऊस।
जवा पाह्यजे तवा तं मरत नाई।
जायाले पाह्यजे तवा जात बी परत नाई।
सोयाबिनच्या लावल्या वावरापरत गंज्या।
कास्तकाराची जिनगीच कटी पतंग बीन मांज्या।
पायजे तवा पा लागते वाट त्याची भिरीभिरी।
नितनेम नवा त्याचा सुरू कवा पिरीपिरी।
कास्तकाराच्या दुखाले अथी नाई पारावार।
त्यातल्या त्यात याची कवा पडते गार।
धुळीस मियते लय झडतिचं सपन।
बस झालं लेका आता पायजे तपन।
कास्तकार सापडला अख्खा अस्मानी सुलतानीच्या ईळख्यात।
घोंगावतात मंग इपरीत ईचार या बोळख्यात।
चांगला मालइ ईका लागते त्याले मंग सडक्यात।
दिवाई दसरा होते तवा त्याचा थोडक्यात।
अगुदरच जनतेवर हाय महागाईचं सावट।
परतीचा पाऊसई लय झाला चावट।
पीव्वी धम सोन्या सम व्हत व्हती जवारी।
त्यात या परतीच्या पावसाची आली वारी।
जवारी झाली कायी कायी घुस।
पराटीच्या बोंड्याईची अख्खी नासधुस।
ठरोलं व्हतं लेका झडतीच्या शर्यतीले यंदा आपून ऱ्हाउच।
अन् धो धो सुरू झाला परतीचा पाऊस।
भागत नाई सांज तवा जीव येते जेरीस।
बायकोले नई साडी नाई झालं येक वरीस।
काय कराव लेका या फुरफुरीस।
फुलोरई गयला शेंग नाई तुरीस।
पोट्टं म्हने बा यंदा पाह्यजे मिकीमाऊस।
म्या म्हनलं अवलीबॉच्या जत्रीत बाबू घिऊच।
लय गांजते लेका हा परतीचा पाऊस।
लय गांजते लेका हा परतीचा पाऊस…
किसन मानकर
वाडेगांव
९१३०७४३९८१
बुढा : ह्या थंडीपायी सब्बन यटाय लवकरस सुनसान झालं काय वं.
बुढी :नायी मी हाय न् जेती .
बुढा : मंग मले असं कावुन वाटुन रायलं.
बुढी : सातरीत धसुन आंगावर एकावर एक पाच वाकयामंदी अंदर मुसकाळ घालुन झपान त् सुनसान नै त् काय तमास्या रायल्यासारखं वाटन काय माय?
झाेपा उगेमगे..
तेवढ्यात बुढा : जराकसी मांगच्या सामटीकुन चक्कर मारून पाय बरं मले खुळखुळ आवाज आला तिकळुन.
बुढी : झाेपा मतलं न् …तुमचे कान् वाजुन रायले ह्या थंडीन्..
बुढा :अवं नाई खरचं आपल्या झ्यांजी जाैळ कुनीतरी हाय.
तसास् बुढा उठला अन् कंदिल घीवुन मांग गेला..
“च्या भैनचं पाेट्ट काय व्हय बे फाेतरा भैन तुमाले काय लाेकायच्या झ्याज्या, कुळं मुळंबी नाई पुरत कायबे. लयस हाय लेक
पाेट्ट :तसचं भाे पयत गेलं..
अबे पक्या येवळुसचं भेटलं बे..
भैन बुडगं आलं मंदात बाेमलत काेन हाेय, हाेय करत.
पक्या :जाै दे.
घे आन दे थे डबी माह्याकळं..
घ्या बे पाेट्टेहाे आता.. घ्या शेकुन.. मांगुन पुढुन… 😁😁😁😁
✍दिपकराज ह. खवशी नागपूर ९८९०९८९८५९
— बिन्डोस्की —
( लोकलाज)~~
काय म्हनतीन
मना लोकलाज
आली जरी खाज
उगा राहे
दाबून थोबाड
वरतून मार
दनक्याचा भार
सोसे मुकी…
मनाचं शिंगरू
ठेवशिन धरू
जशी चढे दारू
उफानते …
म्हनून अबला
नड्डास दाबला
सोतास मारला
आत्माराम….
फेक आता झुल
अगासात उड
लोकलाज सोड
माये आता….
काय म्हनतीन
बुजाळनं सोड
येसन थे ओढं
सांड्यायची…
••• विजय बिंदोड •••
▪पांढरकवडा▪
¤यवतमाळ¤
ज्याची त्याची सासू आणून एकदा भडका झाला की त्याची पुरी राख हुईन तदलोक 12 वाजेलोक कोणी उठत नाई …
असी मिटिंग भरते की अरे बापा रे…
जेवण खावन होयेल असते त नो टेन्शन काम असते बिलकुल …
विषय तुरी वर काय प्रोक्लेम मारलं की कोराजन पासून सुरू होते…
त तो काय म्हणे की काले येता आमच्या यटायात …इकडे वट्यावर बसत नोका जाऊ म्हणे…
हे झालं की …तो फडणवीस पायजेच नोता न हो … नीरा गोडबोल्या आय तो … तो उद्दव त बर काय चान्ग मँग करते त्याच त्याले माईत …
हे झालं की बातच … करता काय मंग भरीत पुरी … काल च करू आपल्या वाड्यात…वांगे माये मयातले….बाकीच पाऊण घ्या तुमि…
त भाऊ या तापा चा आनंद आयऱ्या गयऱ्या ले नाई भेटत तो गावात च भेटते भाऊ …
अडलोक गप्पा होतात… म्हणजे ते व्हॉटसऍप , फेसबुक अन त्या टीव्ही त बी तुमचं मनोरंजन होणार नाइ … यवळ मनोरंजन या 9 च्या तापावर होते…
मीरची ची भाजी (Mirchichi Bhaji) –
हिवाया लागला म्हणजे मीरच्याई च्या भाजीचा मोसम आला 😄😋
वर्हाडात त्यातल्या त्यात मलकापुर भागातली मीरच्याईची भाजी म्हतल म्हणजे तोंडाले पाणी सुटल्या शिवाय रायत नाई .😋
मीरच्याईची भाजी म्हणजे बारीक़ चिरेल मीरच्या , तुरीची दाय , खोबर , खड़ा मसाला , आंबटचूका , इ.
गणपतीच्या दहा दिवसांत याच भाजीचा भंडारा असते, पोर-पोर पैसे जमा करून पार्टी करतात,कोणा ले पोरगा झाला की मीरच्याईची भाजीची पंगत, इरीले (विहीर) पाणी लागल की याच भाजीची पंगत,कोणाले नोकरी लागली की याच भाजीची पंगत.
😄
भाकर सोबत खा लागते.निम्बू पिउन , कांदा मुया मेथी तोंडी लाव्याले असल की झाल मंग…😀
भूक लागेल नसली तरी या भाजीची तर्री पाउन तुमाले भूक लागल्या शिवाय रायणार नाई .😉
मीरच्या ईची भाजी ले तुरीची दाय लागणारच अन ते माग झाली आता , तरी लोक काई खाण काई सोडत नाइ , ज्याच्या घरची दाय आय त्याले काई टेंशन नाई.
यकदार खाओगे बार बार मांगोगे .
यकच दार खा नाइ आशिक झाले तं नाव बदलून ठेवा .😄

Have a WordPress.com account? Log in now.