लोकलाज

— बिन्डोस्की —
( लोकलाज)
~~
काय म्हनतीन
मना लोकलाज
आली जरी खाज
उगा राहे

दाबून थोबाड
वरतून मार
दनक्याचा भार
सोसे मुकी…

मनाचं शिंगरू
ठेवशिन धरू
जशी चढे दारू
उफानते …

म्हनून अबला
नड्डास दाबला
सोतास मारला
आत्माराम….

फेक आता झुल
अगासात उड
लोकलाज सोड
माये आता….

काय म्हनतीन
बुजाळनं सोड
येसन थे ओढं
सांड्यायची…

••• विजय बिंदोड •••
▪पांढरकवडा▪
¤यवतमाळ¤

Published by Shiva Jamale-Patil

A true Varhadi lover with a habid to write on it.

Leave a comment

Design a site like this with WordPress.com
Get started