मिरची ची भाजी (Mirchichi Bhaji)

मीरची ची भाजी (Mirchichi Bhaji) –

हिवाया लागला म्हणजे मीरच्याई च्या भाजीचा मोसम आला 😄😋

वर्हाडात त्यातल्या त्यात मलकापुर भागातली मीरच्याईची भाजी म्हतल म्हणजे तोंडाले पाणी सुटल्या शिवाय रायत नाई .😋

मीरच्याईची भाजी म्हणजे बारीक़ चिरेल मीरच्या , तुरीची दाय , खोबर , खड़ा मसाला , आंबटचूका , इ.

गणपतीच्या दहा दिवसांत याच भाजीचा भंडारा असते, पोर-पोर पैसे जमा करून पार्टी करतात,कोणा ले पोरगा झाला की मीरच्याईची भाजीची पंगत, इरीले (विहीर) पाणी लागल की याच भाजीची पंगत,कोणाले नोकरी लागली की याच भाजीची पंगत.
😄
भाकर सोबत खा लागते.निम्बू पिउन , कांदा मुया मेथी तोंडी लाव्याले असल की झाल मंग…😀

भूक लागेल नसली तरी या भाजीची तर्री  पाउन तुमाले भूक लागल्या शिवाय रायणार नाई .😉

मीरच्या ईची भाजी ले तुरीची दाय लागणारच अन ते माग झाली आता , तरी लोक काई खाण काई सोडत नाइ , ज्याच्या घरची दाय आय त्याले काई टेंशन नाई.

यकदार खाओगे बार बार मांगोगे .
यकच दार खा नाइ आशिक झाले तं नाव बदलून ठेवा .😄

Published by Shiva Jamale-Patil

A true Varhadi lover with a habid to write on it.

Leave a comment

Design a site like this with WordPress.com
Get started