बुढा : ह्या थंडीपायी सब्बन यटाय लवकरस सुनसान झालं काय वं.
बुढी :नायी मी हाय न् जेती .
बुढा : मंग मले असं कावुन वाटुन रायलं.
बुढी : सातरीत धसुन आंगावर एकावर एक पाच वाकयामंदी अंदर मुसकाळ घालुन झपान त् सुनसान नै त् काय तमास्या रायल्यासारखं वाटन काय माय?
झाेपा उगेमगे..
तेवढ्यात बुढा : जराकसी मांगच्या सामटीकुन चक्कर मारून पाय बरं मले खुळखुळ आवाज आला तिकळुन.
बुढी : झाेपा मतलं न् …तुमचे कान् वाजुन रायले ह्या थंडीन्..
बुढा :अवं नाई खरचं आपल्या झ्यांजी जाैळ कुनीतरी हाय.
तसास् बुढा उठला अन् कंदिल घीवुन मांग गेला..
“च्या भैनचं पाेट्ट काय व्हय बे फाेतरा भैन तुमाले काय लाेकायच्या झ्याज्या, कुळं मुळंबी नाई पुरत कायबे. लयस हाय लेक
पाेट्ट :तसचं भाे पयत गेलं..
अबे पक्या येवळुसचं भेटलं बे..
भैन बुडगं आलं मंदात बाेमलत काेन हाेय, हाेय करत.
पक्या :जाै दे.
घे आन दे थे डबी माह्याकळं..
घ्या बे पाेट्टेहाे आता.. घ्या शेकुन.. मांगुन पुढुन… 😁😁😁😁
✍दिपकराज ह. खवशी नागपूर ९८९०९८९८५९