एक दिवस उधारीचं गिऱ्हाईक आलं माह्या दुकानात,म्हणे भौ,मी राह्यतो मांगलच्याच मकानात.
उधार आपल्याले बिलकुल पटत नाई,नगदीले आपुन जराबी नटत नाई.
पन गेल्या सालीच केला म्यां ईवाई लेकीची माह्या हे पयलीचं हाय दिवाई,
लेक जवायाले घ्या लागते कपडे.
अनखीन येक-दोन मांग हायेत लफडे,
पयल्या दिवाईले आना लागते लेक.
त्यात लाल्याचा लेट झाला चेक,
मले सौदे पाह्यजे दोन-चार पह्यल्यांदाच मांगुन राह्यलो भौ उधार.
म्या म्हनलं मा नाई उधारीचा धंदा,
मले फकस्त पाह्यजे रोख थो चंदा.
चेक आल्या-आल्या रोख घिउन यील,
तुमचे पैसे तुमच्या हाती बिनधोक दील.
पैसे-पैसे काय करता शेठ,
माह्ये भेटल्या-भेटल्या घिउन यील थेट.
पैश्यालेतं कोंबडीबी खात नाई,
आज उधार घेतल्याबीगर मी काई जात नाई.
नगदीत तं त्याची च्यापत्तीचीबी सोय नसते,
उधारीत म्हनलकी थो च्यायला हत्तीबी घेते.
उधार मांगताखेपी होतात थे हरन,
वसुलीले चकरा मारता-मारता आपलं होते मरन.
उधारी साठीतं काय बी करतात बायना,
वसुलीसाठी झीजतात आपल्याचं भौ मंग वायना.आपल्याचं भौ मंग वायना….
किसन मानकर
वाडेगांव
९१३०७४३९८१
