
थे धावत होती
मी पयत होतो
थे दूर जात होती
मी रडत होतो
दिसली जवा मले
थे तती च उभी होती
कोण जाणे कोणास ठाउक
कोणाची वाट पायत होती
गळबळी न जवा मी
तिच्या जवळ पोचलो
अंदाज हाय माया
मी तिले असन दिसलो
दिसलो जवा तिले
थे लागली भाऊ पयाले
धाक धुक मोठी माया
लावली भाऊ जीवाले
गेलती भाऊ थे पुढे
मले मागून दिसत होती
दोस्त म्हणे मायावाला
थे तूयावालीच होती
गती गती थे माया
नजरेच्या आळपं गेली होती
Last time होता भाऊ थो
दुसरी st च न्होती…
भल्या भल्या न
तिच्या संग घेऊ नये पंगा
थे आयकत नाही कोणाची
बराबर दावते इंगा…
गौरव श्री. कांडलकर
मोझरी
7666067286